अखेर काश्मीरमध्ये टेलिफोन, जम्मूमध्ये इंटरनेट सेवा झाली सुरू


वेब टीम : जम्मू
कलम ३७० हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जम्मू-काश्मीरमध्ये लावलेले निर्बंध हळूहळू उठविण्यास सुरुवात केली आहे.

खोऱ्यातील शाळा, महाविद्यालये सोमवारपासून सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर जम्मूमध्ये ‘२ जी’ इंटरनेट तर, काश्मीरमध्ये फोन सेवा सुरू केली आहे.

जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव बी.आर.सुब्रमण्यम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन खोऱ्यातील परिस्थितीची माहिती दिली होती.

येथील निर्बंध टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येतील,असे त्यांनी सांगितले होते.त्यानुसार आज पहिले पाऊल पडले आहे.

जम्मू-काश्मीरच्या उधमपूर, रियासी, कठुआ, सांबा व जम्मू शहरात २ जी इंटरनेट सेवा सुरू केली आहे.

अन्य सर्व निर्बंध देखील उठवले आहेत. काश्मीरमध्ये मात्र तूर्त केवळ फोन सेवा सुरू आहे. इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती पाहून घेतला जाणार आहे. अटकेत असलेल्या लोकांनाही त्यानंतरच सोडले जाईल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post