अकोल्यात पिचडांचा पाचपुते होणार : राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष फाळके


वेब टीम : अहमदनगर
2014 सालची श्रीगोंद्यातील पुनरावृत्ती 2019 मध्ये अकोल्यात घडविणार असे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, लढा गद्दारांची लढा फितुरांशी अशी घोषवाक्य घेऊन राज्यात तीन टप्प्यात 55 विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची शिव स्वराज्य यात्रा निघणार आहे.

नगरला दि.७ रोजी यात्रा मुक्कामाला येणार आहे. नगर व शेवगाव येथे रॅली, जाहीर सभा, कॉर्नर सभा होणार आहेत. यात्राही शिवनेरी ते रायगड अशी असणार आहे. यानंतर दुसऱ्या टप्प्यात दि.१९ रोजी जामखेड येथे यात्रा येणार आहे. या रॅलीत प्रामुख्याने खा. उदयनराजे भोसले व खा. अमोल कोल्हे यांचा समावेश असून यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे-पाटील व पक्षाचे विद्यमान आमदार असणार आहेत अशी माहिती फाळके यांनी दिली.

 ते पुढे म्हणाले की, विधानसभेला राष्ट्रवादी पक्ष सक्षमतेने सामोरे जाणार आहे. जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीच्या वतीने आपल्यातून डॉ किरण लहामोरे, अशोक भांगरे, सतीश भांगरे कोपरगावातून आशुतोष काळे, नेवासातून विठ्ठलराव लंघे, राहुरीतून प्रजाक्ता तनपुरे, शेवगाव तून चंद्रशेखर घुले, अँड. प्रताप ढाकणे, नगर शहरातून संग्राम जगताप, पारनेरमधून निलेश लंके, प्रशांत गायकवाड, श्रीगोंदातून राहुल जगताप, कर्जत मधून रोहित पवार, मंजुषा गुंड आदी इच्छुक आहेत, असे त्यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post