पुण्यातील भाजपच्या मुलाखती 29 ऑगस्टला


वेब टीम : पुणे
विधानसभा निवडणूकांसाठी भाजपकडून येत्या 29 तारखेला इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडुन मिळाली आहे.

यादिवशी भाजप पुणे प्रभारी आशिष शेलार हे आपटे रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये या मुलाखती घेणार आहेत.

पुण्यात भाजपची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे सर्व आठही मतदारसंघाच्या मुलाखती यावेळी घेण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडुन देण्यात आली आहे. प्रत्येक उमेदवाराला अर्धा तासांचा कालावधी देण्यात येणार आहे. शहरामध्ये भाजपच्या इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघामधून तीन ते चार इच्छुक आहेत.

विधानसभेत शिवसेनेबरोबर युती झाल्यास त्यांना जागा सोडावी लागणार आहे. पुण्यातील आठही आमदार भाजपचे असल्यामुळे एकही जागा सोडण्यासाठी भाजप सध्या तरी तयार नाही. लोकसभा निवडणूकीत भाजपच्या उमेदवाराला भरघोस मते मिळाल्यामुळे भाजपच्या अपेक्षा अजून उंचावल्या आहेत.

खडकवासला, हडपसर, वडगावशेरी, पर्वती, कॅन्टोमेंट, कसबा, शिवाजीनगर, कोथरुड हे मतदारसंघ पुण्यात येतात. यापैकी खडकवासला, हडपसर, वडगावशेरी या मतदारसंघामधील उमेदवार कायम राहतील अशी चर्चा आहे. मात्र पर्वती, शिवाजीनगर, कॅन्टोमेंट, कसबा, कोथरुड मतदारसंघामध्ये उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा आहे.

कसबा मतदारसंघामधून खासदार गिरीष बापट यांची जागा रिकामी झाल्यामुळे आता कसब्यामधून महापौर सौ. मुक्ता टिळक, नगरसेवक हेमंत रासने, धीरज घाटे, गणेश बिडकर हे इच्छुक आहेत. कोथरुड मतदारसंघामध्ये सुध्दा उमेदवारीसाठी भाजपमध्ये स्पर्धा आहे. मुरलीधर मोहोळ आणि मेधा कुलकर्णी हे इच्छुक आहेत.

त्याचबरोबर पर्वती मतदारसंघामध्ये सुध्दा इच्छुकांची संख्या मोठी आहे. नवनियुक्त शहराध्यक्ष माधुरी मिसाळ आणि सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्यासह भाजपच्या अनेक नगरसेवकांनी उमेदवारीसाठी दावा केला आहे. शिवाजीनगरमध्ये सुध्दा बदल घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post