जम्मू काश्मीरमधील हिंसाचाराच्या मागे पाकिस्तानच : राहुल गांधी


वेब टीम : दिल्ली
काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीर मुद्द्यावरून पाकिस्तानवर निशाणा साधला आहे.

‘जम्मू-काश्मीरमधील हिंसाचाराला पाकिस्तानचेच प्रोत्साहन आणि पाठिंबा आहे’ अशी टीका राहुल यांनी केली आहे.

काश्मीरमध्ये पाकच्या प्रोत्साहनामुळेच हिंसाचार आहे, पाकिस्तान हा जगभरातील दहशतवादाला पाठिंबा देणारा प्रमुख देश आहे, असंही राहुल यांनी ट्विटद्वारे म्हणलं आहे.

काश्मीर प्रश्नात हस्तक्षेप नको
अनेक मुद्द्यांवर आपण केंद्र सरकारशी असहमत आहोत, मात्र काश्मीर हा भारताचा अविभाज्य आहे.

काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न असून पाकिस्तान किंवा इतर कोणत्याही देशाने यात मध्यस्थी करण्याची गरज नाही, असंही राहुल यांनी म्हणलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post