राज्यभरात पाऊस गायब; कोकणात हलक्या पावसाचा अंदाज


वेब टीम : पुणे
उत्तर पूर्व मध्य प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. ते उत्तर-पश्चिम दिशेने पुढे जाणार आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे.

पुढील तीन ते चार दिवस संपूर्ण राज्यात कोरडे हवामान राहणार आहे.तर उत्तर-महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातील तुरळक भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने शुक्रवारी वर्तविला.

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मागील दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. मुंबई आणि कोकणातील काही भागात पाऊस पडला.

मागील २४ तासांत कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार, तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बर्‍याच ठिकाणी पाऊस पडला.

राज्यात मागील २४ तासांत कोकणातील केपे ८० , दोडामार्ग, सांगे ७० , कानकोन, माथेरान, पनवेल, सावंतवाडी ६०, खालापूर, मडगाव ५०, जव्हार ४०, चिपळूण,वाडा ३०, बेलापूर (ठाणे), कणकवली, मंडणगड, म्हसळा, सुधागड पाली, तलासरी, वाल्पोई २०. मध्य महाराष्ट्रातील गगनबावडा, लोणावळा (कृषी), महाबळेश्वर ४०, अक्कलकुवा, इगतपुरी, नवापूर, पन्हाळा, पौड, मुळशी, त्र्यंबकेश्वर ३०, चांदगड, जामनेर, खेड, राजगुरूनगर, पेठ, राधानगरी, तळोदा २०, आजरा, हरसूल, नंदुरबार, ओझर (नाशिक), ओझरखेडा, शहादा, शाहुवाडी, शिराळा, सुरगणा १०.

मराठवाड्यातील उस्मानाबाद, तुळजापूर १०. विदर्भातील मौदा ३०, धरणी, गोंदिया २०, बार्शी-टाकळी, भामरागड, चिखलदरा, कामठी, लाखनी, मूलचेरा, नांदुरा, पातूर, तुमसर, उमरेड प्रत्येकी १०. घाटमाथा परिसरातील ताम्हिणी ९०, दावडी, कोयना(नवजा) ८०, शिरगाव, डुंगरवाडी ६०, अम्बोणे, कोयना (पोफळी) ५०, लोणावळा (ऑफिस) ४०, लोणावळा (टाटा), वळवण ३०, शिरोटा, खोपोली, खांद २० आणि वाणगाव येथे १० मि.मी. पावसाची नोंद झाली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post