राज ठाकरेंकडे नाही राहिला काही उद्योग...; रामदास आठवलेंचा टोला


वेब टीम : पुणे
राज ठाकरे यांच्याकडे काही उद्योग राहिला नाही. म्हणून ते देशभरातील नेत्यांच्या भेट घेत आहे. नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यापेक्षा राज्यात मनसे कशी वाढेल याकडे राज ठाकरे यांनी लक्ष द्यावे, असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला आहे.

ईव्हीएम विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देशभरातील नेत्यांची भेट घेत आहे. ईव्हीएम विरोधात आंदोलन केले जाणार आहे. मात्र, त्या आंदोलनाचा काही एक फरक पडणार नाही. अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मांडली.

ईव्हीएम मशीन हे काँग्रेसने आणले आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणले नाही. त्यामुळे ईव्हीएमबाबत विरोधकांनी बोलता कामा नये. मतदानावेळी लोकांचा हात आपणहून कमळाकडे जात आहे. याला कोणी काही करू शकत नाही, असे आठवले यावेळी म्हणाले. बारामतीत ईव्हीएम मशीन खराब नव्हते का? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

विधानसभा निवडणुकीत रिपाइंने किती जागांची मागणी केली, असा सवाल करण्यात असता, आम्ही दहा जगांची मागणी केली असल्याचे आठवले यांनी सांगितले. तसेच विधानसभा निवडणुकीनंतर एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद मिळावे आणि 5 महामंडळे देण्यात यावी, अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post