भाजप खासदाराच्या मुलाला अटक

टीम : कोलकाताभाजप खासदार रुपा गांगुली यांचा मुलगा आकाश मुखर्जीला अटक झाली. रॅश ड्रायव्हिंग म्हणजेच बेदरकारपणे गाडी चालवून ती धडकवल्या प्रकरणी ही अटक झाली.

WB 02 W 3182 या क्रमांकाची कार अत्यंत भरधाव वेगात एका भिंतीला त्याने गुरुवारी धडकवली. रुपा गांगुली यांच्या मुलाने मद्यप्राशन केले होते की नाही याचा अहवाल अद्याप बाकी आहे.

महाभारत या लोकप्रिय मालिकेत द्रौपदीची भूमिका साकारुन रुपा गांगुली घराघरात पोहचल्या. त्यांच्या मुलाला या प्रकरणी आज न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

आकाशचे कारवरचे नियंत्रण सुटल्याने कार एका भिंतीला धडकली. रॉयल कोलकाता गोल्फ क्लबची ही भिंत होती. या घटनेत आकाशला किरकोळ दुखापत झाली.

ही कार स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतली. या प्रकरणी पुढील चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी म्हटले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post