आ. संग्राम जगताप यांच्या बदनामीचे कारस्थान : अजित पवार


वेब टीम : अहमदनगर
आमदार संग्राम जगताप हे लोकप्रिय आणि कार्यशील आमदार असल्याने मधल्या काळात त्यांना बदनाम करण्याचे कारस्थान करण्यात आले होते. मात्र नगरकरांचे संग्राम जगताप यांच्यावर प्रेम आहे म्हणून ते लढा देऊ शकले अशा शब्दात राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी त्यांचे कौतुक केले.

देशभरात बेरोजगारीचे संकट आलेले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या मतदारसंघात 'आयटी हब' तयार केले आहे.

आमदार संग्राम जगताप यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या 'आयटी हब'ला आज राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी भेट दिली.

आमदार संग्राम जगताप यांच्या या उपक्रमामुळे नगर जिल्ह्यातील असंख्य बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post