इंग्लंडच्या या महिला क्रिकेटपटूने केलं न्यूड फोटोशूट; कारण वाचाल तर चकित व्हाल


वेब टीम : लंडन
इंग्लंडच्या क्रिकेट संघाची यष्टीरक्षक सारा टेलरने जनजागृतीसाठी न्यूड फोटोशूट केले आहे.

सारा भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीप्रमाणेच चपळ यष्टीरक्षण करते. साराने नुकत्याच केलेल्या फोटोशूटमध्येही ती यष्टीरक्षण करताना दिसत आहे.

 मात्र, यावेळी तिच्या अंगावर एकही कपडा दिसत नाहीये. womens health uk या महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थेसाठी तिने हे फोटोशूट केले आहे.


''जे मला खूप चांगलं ओळखतात त्यांना माहीत आहे हे असे फोटोशूट करणे माझ्या कंफर्ट झोनच्या पलिकडचे आहे. पण, एका चांगल्या उद्देशासाठी मी हे केले आहे. womens health uk या महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थेसाठी मी हे फोटोशूट केले आहे. मी नेहमी माझ्या शरीराबद्दल तक्रार करायचे. मात्र, या फोटोशूटसाठी मला त्या सगळ्या तक्रारींवर मात करावी लागली. प्रत्येक मुलगी ही सुंदरच असते,'' अशी पोस्ट तिने इन्स्टाग्रामवर टाकली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post