शबाना आझमी दिसणार गुप्तचर अधिकाऱ्याच्या भूमिकेत


वेब टीम : मुंबई
सध्या बरेच नामवंत अभिनेते आणि अभिनेत्री, मायक्रो पडद्यावर येण्यासाठी प्रयत्नशील दिसत आहेत. यामध्ये आता आणखी एका नावाची भर पडली आहे.

अभिनेत्री शबाना आझमी लवकरच ‘हॅलो’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहेत. या सिरीजची निर्मिती स्टीव्हन स्पिलबर्ग यांची आहे. ‘हॅलो’ या नावाने गाजलेल्या व्हिडीओ गेमवरुन ही सीरिज होत आहे.

या वेब सीरिजचे चित्रीकरण बुडापेस्टमध्ये होणार आहे. ओट्टो बॅथर्स्ट याचे दिग्दर्शन करणार असून शबाना या वेब सीरिजमध्ये ऍडमिरल मार्गारेट पॅरागोन्स्की या नौदल गुप्तचर अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहेत.

शबाना यांनी यापूर्वी मॅडम सोसात्झ्का, ला न्यूट बेन्गाली, सिटी ऑफ जॉय अशा आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टमध्ये काम केले आहे. तरी या वेब सिरीजमध्ये त्यांना बघणे भारतीय प्रेक्षकांना उत्सुकतेचे ठरणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post