आम्हाला श्रीनगर हवे होते पण, आता मुजफ्फराबाद वाचविणेही मुश्किल: भुट्टो


वेब टीम : इस्लामाबाद
’पाकिस्तान पीपल्स पार्टी’चे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी इम्रान खान यांच्यावर सडकून टीका केली. मोदींनी काश्मीर हिसकावला आणि पाकिस्तानचे पंतप्रधान अजून झोपलेलेच आहेत.

श्रीनगर कसे मिळवायचे हे आपले धोरण होते, परंतु, आता मुझफ्फराबाद वाचवणेही कठीण झालंय,अशा शब्दांत भुट्टो यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर टीका केली.

पाकिस्तानच्या सरकारला सर्व बाबतीत अपयश आले आहे. इम्रान खान नरेंद्र मोदी यांच्यासमोर काहीच बोलू शकत नाही. ते आता मांजर बनले आहेत.

इम्रान खान यांना पाकिस्तानच्या जनतेने निवडून दिले नाही तर त्यांना काही लोकांनी त्यांच्या फायद्यासाठी पंतप्रधानपदी बसवले आहेत. नेतृत्त्व करण्यात इम्रान खानला पूर्णपणे अपयश आले आहे. ते विरोधकांच्या निर्णयामागे चालतातइम्रान खान यांनी आपले नेतृत्त्वगुण दाखवण्याची हीच योग्य वेळ आहे.

पाकिस्तानमधील जनता महागाईच्या त्सुनामीत वाहून जात आहे. आता तर काश्मीरही हातातून गेला आहे, असा आरोपही भुट्टो यांनी केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post