थोरातांना रोखणार: विखेंनी घेतली थोरातांच्या 'गुरू'ची भेट


वेब टीम : संगमनेर
आगामी विधानसभा निवडणुकीआधी नगर जिल्ह्यातील ताकदवार नेते अशी ओळख असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजकीय मुत्सद्देगिरी दाखवली आहे.

कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना घरच्या मैदानावर पराभूत करण्यासाठी विखेंनी प्रयत्न सुरू केले आहेत.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरातांचे आणि राजकीय गुरू असलेल्या बाळासाहेब वाघ यांची घरी जाऊन भेट घेतली आहे. तसेच यावेळी विखेंनी नतमस्तक होऊन बाळासाहेब वाघ यांचे आशीर्वाद घेतले.

त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत थोरातांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी विखे आपली सर्व शक्ती पणाला लावणार असल्याचे दिसत आहे.

थोरातांच्या मतदारसंघात विखेंचा 'संपर्क'
एकमेकांचे राजकीय विरोधक असलेल्या विखे आणि थोरात यांच्यात आता राजकीय संघर्ष आणखी वाढला आहे. काँग्रेसला उभारी देण्यासाठी थोरातांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आल्यानंतर आता भाजपाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरातांना शह देण्यासाठी त्यांच्या मतदारसंघातच संपर्क कार्यालय सुरू केले आहे. तसंच थोरात विरोधकांची मोट बांधली आहे.
काँग्रेसमध्ये असतानाही या दोघांचे राजकीय युद्ध सुरू असल्याचे अनेकदा बघायला मिळाले. मात्र आता विखेंच्या भाजपप्रवेशानंतर हे युद्ध आणखी तीव्र झाले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कोण कुणाला शह देणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates