शिक्षकाने केला विद्यार्थीनीचा विनयभंग


वेब टीम : बीड
क्लासेसमध्ये येणार्‍या नववीच्या विद्यार्थीनीचा शिक्षकानेच विनयभंग केल्याचा प्रकार गेवराई तालुक्यातील उमापूर येथे घडला. घटनेची माहिती मुलीच्या घरच्या लोकांना समजल्यानंतर सदरील शिक्षकाला चोप देत याबाबत चकलांबा पोलीसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलीसांनी गुन्हा दाखल करून शिक्षकास अटक केली.

बीड शहरातील रामतिर्थ माध्यमिक विद्यालयात भागवत राऊत (वय ४०) हा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. (पान ७ वर)
 सदरील हा शिक्षक गेवराई तालुक्यातील उमापूर येथील असल्याने तो गावात पहिली ते दहावी पर्यंत क्लास घेतो.

रात्री नववी वर्गात शिक्षण घेणार्‍या एका विद्यार्थीनीचा त्याने विनयभंग केला. हा प्रकार मुलीने आपल्या घरच्या लोकांना सांगितल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी त्याला चांगलाच चोप देत चकलांबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

त्यानुसार भागवत राऊत याच्याविरोधात कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून शिक्षकाला पोलीसांनी अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास चकलांबा पोलीस ठाण्याचे पीएसआय सिरसाट हे करत आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post