नेवाशात पैशाच्या जोरावर सत्ता मिळविण्याचा काहींचा उद्योग : विठ्ठलराव लंघे


वेब टीम : नेवासा
नेवासा तालुका उजाड होत असताना आजी-माजी आमदार सर्वसामान्य जनतेला केवळ भुलविण्याचे काम करीत आहेत.आरोप प्रत्यारोपाच्या वाकयुध्दात मशगुल आहेत.विकासाचा आभास निर्माण केला जात आहे.पाटपाण्याचा प्रश्न बिकट बनलेला आहे.शेतकऱ्यांना कोणी वाली राहिलेला नाही.नेवासा तालुक्यात केवळ पैशाच्या जोरावर सत्ता मिळविण्याचा उद्योग सुरू झालेला आहे, असा आरोप जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील यांनी केला.

नेवासा तालुक्यातील गिडेगाव येथे राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष नवनाथ साळुंके यांचे वस्तीवर राष्ट्रवादी साज प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांचे अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नेवासा विधानसभा निवडणूक विचार मंथन मेळावा बुधवार दि.28 ऑगस्ट रोजी संपन्न झाला.यात अनेकांनी विठ्ठलराव लंघे यांनीही उमेदवारी करावी त्यांना तन मन धनाने मदत करू अशी ग्वाही उपस्थित कार्यकर्ते व वक्त्यांनी दिली.

माजी आमदार पांडुरंग अभंग म्हणाले,विठ्ठलराव लंघेच्या उमेदवारीची जबाबदारी नरेंद्र पाटील,शेखरभाऊ यांच्यावर सोडून द्या आणि कामाला लागा.विठ्ठलरावांची उमेदवारी पक्की आहे.त्यामुळे मनात संभ्रम ठेवू नका.घुले-लंघे परिवाराचे समाजसाठीचे कार्य आणि कार्यकर्त्यांची फळी आपल्या बरोबर आहे.फुले-शाहू-आंबेडकर यांच्या परिवर्तनवादी विचारांचा हा मतदारसंघ आहे.कोणी कितीही पैसे वाटा मतदार आपला स्वाभिमान कधीच गहाण ठेवणार नाही.दीनदुबल्या व प्रामाणिक माणसाच्या मागे हा मतदार संघ आहे.उमेदवाराने प्रत्यक्ष भेटला पाहिजे एवढीच एकच अपेक्षा मतदारांची असते.कार्यकर्ते व जनतेच्या गाठीभेटी घ्या,कामाला लागा असे आवाहन ही श्री.अभंग यांनी यावेळी केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post