काश्मीर तुमच्याकडे कधी होतं? : राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सवाल


वेब टीम : दिल्ली
जम्मू-काश्मीरला आंतरराष्ट्रीय मुद्दा बनवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुन्हा एकदा फटकारले आहे.

पाकिस्तान काश्मीर मुद्दा वारंवार उपस्थित करत असला तरी त्याला काही अर्थ नाही. उलट गिलगिट-बाल्टिस्तानसह संपूर्ण POK वर पाकिस्तानने बेकायदा कब्जा केला आहे अशा शब्दात राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानवर टीका केली.

ते लडाखमध्ये आयोजित डीआरडीओच्या कार्यक्रमात बोलत होते. भारताच्या संसदेने फेब्रुवारी १९९४ मध्ये सर्व सहमतीने एका प्रस्ताव मंजूर केला.

त्यामध्ये भारताची स्थिती स्पष्ट केली.काश्मीर पाकिस्तानक़डे कधी होते? असा सवाल त्यांनी केला. भारतातूनच तर पाकिस्तानची निर्मिती झाली.

आम्ही पाकिस्तानच्या अस्तित्वाचा आदर करतो याचा अर्थ त्यांनी काश्मीरबद्दल सतत वक्तव्ये करावी असा होत नाही.

POK मध्ये होणाऱ्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाकडे पाकिस्तानने लक्ष द्यावे अशा शब्दात राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले.

दहशतवादाचा वापर करुन पाकिस्तान भारतामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही त्यांच्याशी कशी चर्चा करु शकतो? आम्हाला पाकिस्ताबरोबर चांगले संबंध हवे आहेत. पण त्यांनी आधी भारतात दहशतवाद पसरवणे बंद करावे असे राजनाथ सिंह म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post