विधानसभेसाठी कामाला लागा; अजित पवारांचे आ. जगताप यांना निर्देश


वेब टीम : अहमदनगर
राज्याचे माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी सावेडी गाव येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते संपत बारस्कार यांच्या निवासस्थानी रात्री उशिरा भेट देऊन कार्यकर्त्यांची विचारपूस केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्यामध्ये केलेल्या विविध विकासकामांची कार्यकर्त्यांनी जनतेला माहिती करून द्यावी, असे सांगितले.


यावेळी नगरच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली व आपला पक्ष मजबूत करण्याचे आवाहन करीत नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी त्यांना मदत करण्याचे आवाहन केले.


यावेळी नगरच्या महानगरपालिकेत असणारे राष्ट्रवादीचे सर्व 18 नगरसेवकांनी पवार यांचे स्वागत केले. नगरच्या महापालिकेच्या प्रत्येक निर्णयामध्ये व कामामध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे बोलत त्यांनी नगरसेवकांनाही मार्गदर्शन केले.

तसेच आ. संग्राम जगताप यांनी नगर शहराच्या विकासाच्या दृष्टीने करीत असलेल्या कामांची प्रशंसा करीत एम.आय.डी.सी. मध्ये नव्याने सुरू होत असलेल्या आयटी हबचे आणि आ. जगताप यांच्या कामाचे कौतुक केले. आपण या कामात सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.


नगरकरांनी पूरग्रस्तांना केलेल्या मदतीबद्दल गौरवोद्‌‌गार काढत देशातील कोणत्याही संकटात नगरकरांनी केलेल्या विशेष मदतीबद्दल बोलण्यास आपल्याकडे शब्द नसल्याचे त्यांनी सांगितले.


पुढील विधानसभेच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागावे व जास्तीत जास्त राष्ट्रवादी पक्ष मजबू करावे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या भेटीला विशेष महत्त्व असल्याचे कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे.


यावेळी आ. अरूण जगताप, आ. संग्राम जगताप, पक्ष निरीक्षक अंकुश काकडे, संदीप वर्पे, नगरसेवक गणेश भोसले, कुमार वाकळे, विनित पाऊलबुध्दे, सुनिल त्रिंबके, प्रकाश भागानगरे, डॉ. सागर बोरूडे, शिवाजी चव्हाण, अजिंक्य बोरकर, बाळासाहेब बारस्कर, सतिश बारस्कर, संजय चोपडा, अमोल गाडे, बाबा गाडळकर, मळु गाडळकर, संभाजी पवार, वैभव ढाकणे, संजय घुले, श्री. कुरेशी, सुमतीलाल कोठारी, बाळासाहेब जगताप, सत्यम गुंदेचा आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates