पाकिस्तानच्या सैनिकांची उडाली 'फटफजिती'; परेड करतांना पडली पगडी


वेब टीम : अटारी
पंजाबमधील अटारी-वाघा सीमेवरील ‘बीटिंग द रीट्रीट’ कार्यक्रमा दरम्यान अतिउत्साह दाखवणे एका पाकिस्तानी सैनिकाला महागात पडले.

आक्रमक चेहरा दाखवण्याच्या नादात हा सैनिक परेड करताना इतका लटपटला की त्याची पगडी डोक्यावरून पडली.

शेजारी उभ्या असलेल्या सैनिकाने त्याला कसंबसं सावरलं आणि पगडी जमिनीवर पडण्यापासून वाचवली.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अटारी-वाघा सीमेवर ‘बीटिंग द रीट्रीट’ हा सैन्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी भारत आणि पाकिस्तान अशा दोन्ही देशांकडून हजारो लोक येतात.

या कार्यक्रमा दरम्यान दोन्ही बाजूंनी लाऊडस्पीकरवर देशभक्तीपर गाणी सुरू असतात. लोक आपापल्या देशाच्या समर्थनार्थ घोषणा देतात.

नागरिकांच्या या घोषणाबाजीतच दोन्ही देशांचे सैनिक आपापला झेंडा उतरवतात.

या कार्यक्रमादरम्यान पाकिस्तानच्या एका सैनिकाने आक्रमकता दाखवू पाहिली आणि ते त्याच्या अंगाशी आले. हा व्हिडिओ पाकिस्तानी माध्यमांतही व्हायरल झाला आहे. मात्र हा नक्की कधीचा आहे, हे स्पष्ट झालेले नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post