जुन्या वादातून घोडेगावमध्ये युवकावर गोळीबार


वेब टीम : अहमदनगर
घोडेगाव येथे भर चौकात एका युवकावर अज्ञात इसमाने गोळीबार केल्याची घटना घङली आहे. या घटनेने जिल्ह्यासह परिसरात खळबळ उडाली आहे.

घोडेगाव येथील युवक सचिन गोरख कु-हाडे (वय२५) हा पाण्याच्या टाकीजवळ उभा आसताना मोडारसायकलवर आलेल्या दोन अज्ञात इसमापपैकी मागे बसलेल्या एकाने सचिनवर गोळीबार करून दोन गोळ्या झाडल्या.

त्यातील एक गोळी त्यांच्या खाद्याला लागली. तर दुसरी गोळी जवळून गेली. या घटनेत सचिन जखमी झाला असून त्याला नगर येथे खाजगी रूग्णांलयात उपचारासाठी दाखल केले आहे. हा गोळीबार जुण्या वादातुन झाला आसल्याचे बोलले जात आहे.

घोडेगाव पोलिस चौकीत कार्यरत असणारे पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला असल्याचे समजते. पोलिसांनी पाठलाग केला मात्र,पकडण्यात अपयश आले.

याबाबत सोनई पोलिसांना माहिती मिळताच सोनई पोलिस ठाण्याचे एपीआय जनार्धन सोनवने सहकारी पोलिसांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates