Spectacles 3 सादर : आता नवं डिझाईन आणि दोन एचडी कॅमेरा


वेब टीम : दिल्ली
स्नॅप या स्नॅपचॅट अॅपची मालकी असणाऱ्या कंपनीने त्यांच्या स्मार्ट गॉगल्स स्पेक्टॅकल्स ३ (Spectacles 3) सादर केले आहेत.

या ऑग्मेंटेड रिअॅलिटी आधारित गॉगल्सची नवी आवृत्ती आता नव्या डिझाईनसोबत पहायला मिळेल. 3D इफेक्टसाठी आता आणखी एक कॅमेरा जोडण्यात आला आहे.

हे गॉगल्स नोव्हेंबर महिन्यात spectacles.com वर $380 (₹२७०००) मध्ये उपलब्ध होतील.

आधीच्या मॉडेलपेक्षा याची किंमत दुपटीने वाढली आहे. फॅशनवर लक्ष केंद्रित असणाऱ्या आधीपेक्षा लहान ग्रुपकडे पाहून हे गॉगल आणल्याच स्नॅपने सांगितलं आहे.

आधीच्या मॉडेलला अति प्रतिसाद अपेक्षित करून निर्मिती केल्यामुळे स्नॅपला बरंच नुकसान सहन करावं लागलं होतं.

स्पेक्टॅकल्सद्वारे तुम्ही फोटो व व्हिडिओ काढू शकता. यासाठी केवळ गॉगलवर असणारं बटन दाबावं लागतं. हे रेकॉर्ड केलेले व्हिडिओ लगेच फोनवर ट्रान्सफर करता येतात किंवा यूट्यूबवर अपलोड करता येतात.

 मात्र अनेकांना हे ट्रान्सफर करून मग अपलोड करण्याची प्रक्रिया आवडत नाही. तूर्तास या आवृत्तीमध्ये तरी त्याबाबत काही बदल झालेला नाही.

एका चार्जवर हा गॉगल ७० व्हिडिओ आणि २०० फोटो काढू शकतो. यामधील 4GB चं स्टोरेज १०० व्हिडिओ किंवा १२०० फोटो साठवू शकेल. हे गॉगल त्याच्या कव्हर केसमध्ये ठेवताच चार्ज होतात!

पूर्ण चार्ज होण्यास ७५ मिनिटे लागतील. फोटो 1642 by 1642 pixels तर व्हिडिओ 1216 by 1216 या रेजोल्यूशनमध्ये रेकॉर्ड होतात.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post