दुपारच्या जेवणात काय असले पाहिजे?


वेब टीम : पुणे
असं म्हणतात की, दुपारचे जेवण हे राजासारखे आणि रात्रीचे जेवण हे भिकाऱ्यासारखे असायला हवे. ते अगदी खरे आहे.

कारण दुपारी सगळेच कामात असतात. अशावेळी जेवण रात्रीच्या तुलनेत दुपारी अधिक पचतं आणि शरीराला लागते.

जर तुम्ही वरण, भात, भाजी, पोळी असा साग्रसंगीत डबा नेत असाल तर फारच छान. कारण हेच जेवण योग्य आहे.

शरीराला आवश्यक प्रमाणात प्रोटीन असते. त्या निमित्ताने तुम्ही भाज्याही खाता.

भाज्या करताना त्यामध्ये तेलाचे प्रमाण कमी असू द्या. शक्य असल्यास आणि आवडत असल्यास भाज्या ऑलिव्ह ऑईल किंवा कमीत कमी खोबरेल तेलात बनवा.

तुमची पचनशक्ती वाढवण्यासाठी जेवणाआधी साधारण १० ते १५ मिनिटे आधी एक ग्लासभर पाणी प्या.

प्रत्येक जेवणाआधी पाणी आल्यास उत्तम साधारण सकाळी ८, ११ दुपारी १ आणि ३ यावेळेत आवर्जून पाणी प्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post