नगर : ढोल पथकांच्या वादकांमध्ये मारामारी


वेब टीम : अहमदनगर
विशाल गणपतीची विसर्जन मिरवणूक दिल्ली गेट येथे आली असताना मिरवणुकीतील रुद्रनाद आणि रिदम ढोल पथकातील वादक एकमेकांशी किरकोळ कारणावरून भिडले.

ढोल वाजवणार्‍या काठ्यांनी एकमेकांवर धावून गेले. परंतू प्रसंगावधान असलेल्या पोलिसांच्या लक्षात येतात त्यांनी हस्तक्षेप करत वाद मिटविला.

मानाच्या विशाल गणपतीची मिरवणूक दिल्ली गेट जवळ सायंकाळी साडेपाच वाजता आली होती. या मिरवणुकीत रुद्रनाद पाठोपाठ रिदम ढोल पथक होते.

मिरवणूक पुढे सरकत असताना रिदम ढोल पथकातील वादकाचा रुद्रनाद ढोल पथकातील वादकाला धक्का लागला. यातून दोन्ही वादकामध्ये किरकोळ बाचाबाची झाली आणि त्यातून हा प्रकार घडला.

मिरवणुकीसाठी बंदोबस्तावर असलेले कोतवाली पोलीस कर्मचारी प्रमोद लहारे यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी हस्तक्षेप करत दोन्ही वादकांना एकमेकांपासून बाजूला केले.

त्याच वेळी तिथे मानाच्या विशाल गणपतीचे ज्येष्ठ विश्वस्त अभय आगरकर आले. त्यांनीही या दोघांना समजावून सांगत भांडण मिटवले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post