गणेशोत्सवात नगरला जाताय; मग हे वाहतुकीचे नियोजन नक्की पहा


वेब टीम : अहमदनगर
शहरासह जिल्ह्यात दि.2 ते 12 सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो त्याअनुषंगाने शहरातील तरुण मंडळे मंडळासमोर आरास, देखावे, धार्मिक कार्यक्रम आयोजित करतात. ते पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते.

त्यावेळी वाहतुक सुरळीत व सुरक्षित चालावी व वाहतुकीची कोंडी होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवू नये याकरिता पोलिस प्रशासनाने शहरात वाहतुकीचे नियोजन केले आहे अशी माहिती पोलिस अधिक्षक इशु सिंधु यांनी म्हटले आहे.

गांधी मैदान ते चितळेरोड, चौपाटी कारंजा ते चितळेरोड, माणिक चौक ते भिंगारवाला चौक, अर्बन बँक ते भिंगारवाला चौक, गंजबाजार कॉर्नर ते भिंगारवाला चौक (पारशाखुंट मार्गे येणार्‍या वाहनांकरीता), चॉंद सुलताना हायस्कुल ते मराठा मंदिर दुकानाकडे येणारा रस्ता (डांगेगल्ली), शनिचौक ते तख्ती दरवाजा मस्जिदकडे येणार्‍या रोडवरुन तिनचाकी व चारचाकी वाहन चालविण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच झेंडीगेट, कोठला स्टॅण्ड व नालबंद खुंटकडून रामचंद्र खुंटकडे येणारा रोड, कोंड्यामामा चौक, आडतेबाजार, गंजबाजार कडून दाळमंडईकडे येणारा रोड, सिताराम सारडा विद्यालयाकडून नवीपेठकडून खामकर चौकाकडे येणारा रोड, आझाद चौक, माणिक चौकाकडून भिंगारवाला चौक, अर्बन बँकेकडे जाणारा रोड, नालबंद खुंटाकडून भिंगारवाला चौकाकडे जाणारा रोड, अर्बन बँक चौक ते आझाद चौकाकडून नवीपेठेकडे जाणारा रोड, दिल्लीगेट सांगळेगल्ली चौकाकडून चौपाटी कारंजाकडे जाणारा रोड, सर्जेपुरा चौकाकडून तेलीखुंटाकडे जाणारा रोड, फुलसौंदर चौक, कौठीची तालमीकडून माळीवाडा वेशीकडे जाणारा रोड, सांगळेगल्ली चौकाकडून पटवर्धन चौकाकडे, मेहतर कॉलनीकडे दिल्लीगेटमार्गे निलक्रांती चौकाकडे जाणारा रोड या सर्व रोडवरुन सायंकाळी 6 ते रात्री 1 वाजण्याच्या दरम्यान सर्वप्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

आरास पाहण्याकरीता आलेल्यांना वाहन पार्किंगकरीता रंगभुवन समोर सर्जेपुरा, घोरपडे हॉस्पिटल समोरील पटांगण दिल्लीगेट, गाडगीळ पटांगण सातपुते तालिम, बंगाल चौकीजवळ, बापुशाह दर्गाजवळ कोठला झोपडपट्टी, गैबीपीर पटांगण झेंडीगेट, गांधीमैदान, बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटजवळ, सिद्धीबाग जलविहारजवळ, क्लेराब्रुस हायस्कुल ग्राऊंड स्टेशनरोड, फिरोदिया हायस्कुल, रेसिडेन्शिअल हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज याठिकाणी सोय केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post