बारामतीत अजित पवारांविरुद्ध गोपीचंद पडळकर सामना रंगणार


वेब टीम : पुणे
भाजपमधून वंचित बहुजन आघाडीत गेलेले गोपीचंद पडळकर स्वगृही परतले आहेत.

त्यांच्या प्रवेशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकर यांनी बारामतीतून लढण्याबाबत लवकरच पक्षश्रेष्ठींशी बोलून निर्णय जाहीर करू, अशी घोषणा केली.

यावेळी काँग्रेसचे आमदार काशिराम पावरा आणि शिरपूर काँग्रेसचे अध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

गोपीचंद पडळकर यांनी काही महिन्यांपूर्वी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. मात्र, आज ते स्वगृही परतले.

त्यांच्या प्रवेशावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘गोपीचंद पडळकर हा ढाण्या वाघ आहे, ढाण्या वाघाने जंगलाच्या राजासारखं असावं, म्हणून माझं म्हणणं आहे पडळकरांनी बारामतीमधून निवडणूक लढवावी.’

‘ते वंचितमध्ये गेल्याचे दु:ख झाले होते. पण ते पुन्हा घरात परत आले आहे. त्यांनी धनगर समाजाचे व्रत स्वीकारले.

समाजाला संघटित केले आणि समाजाचा आवाज बुलंद केला.’ अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी पडळकरांचे कौतुक केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post