अमेरिकेच्या निवडणुकीत पुतीन यांनी केला होता हस्तक्षेप?


वेब टीम : न्यूयॉर्क
अमेरिकेत २०१६ मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाचा हस्तक्षेप होता असल्याची चर्चा होती. यावरुन अमेरिकेतही राजकारण चांगलेच तापले होते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रशियाच्या हातचे बाहुले असल्याचेही म्हटले जात होते. यावर अनेकदा अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांनी असे काहीही नसल्याचे स्पष्टीकरणही दिले होते. मात्र, आता आणखी एक खळबळजनक खुलासा झाला आहे.

अमेरिकेची गुप्तचर संस्था CIAच्या एका अधिकाऱ्याने खुलासा केला की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतिन यांनी वैयक्तिक अमेरिकेच्या निवडणुकीत हस्तक्षेप केला होता. या संदर्भात एका वृत्त संस्थेने माहिती दिली.

आपल्या या विधानाची पुष्टी करतना संबंधित अधिकाऱ्याने २०१७ मध्ये दिलेल्या काही सुचनांना डिकोड केल्याचा दावा केला.

CIAच्या अधिकाऱ्याने म्हटले की, पुतिन यांच्याकडून अमेरिकेच्या निवडणुकीत हस्तक्षेपाची सुरुवात २०१६च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या आधीच झाली होती.

रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प हे उमेदवार म्हणून समोर येत असल्याचे जेव्हा स्पष्ट झाले तेव्हा रशियाच्या हस्तक्षेपाच्या हालचाली वाढल्या होत्या.

CIAच्या अधिकाऱ्याने म्हटले की,निवडणुकीत रशियाच्या हालचाली वाढल्याची माहिती इतकी संवेदनशील होती की, ही माहिती तत्कालीन सीआयएचे संचालक जॉन ओ ब्रेनन हे अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या नेहमीच्या पत्रकार परिषदेपांसून दूर ठेवत होते.ब्रेनन अशी माहिती बंद लिफाफ्यामधून शेअर करीत होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post