भैय्या, निकालानंतर लाल दिव्याची गाडी घेऊन नगरला जा: उद्धव ठाकरेंनी राठोडांना दिली उमेदवारी


वेब टीम : मुंबई
मुंबईमध्ये आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी मंत्री व शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या उमेदवारीची घोषणा केली.

राठोड यांना पक्षाच्या उमेदवारीचा एबी फॉर्मही स्वत: उद्धव ठाकरे यांनी राठोड यांच्याकडे सुपुर्द केला. ‘भैय्या, आरपारची लढाई करा. नगरमधून जिंकलेच पाहिजे. निकालानंतर मुंबईत या अन् कॅबिनेट मंत्री पदाचा लाल दिवा घेऊनच नगरला जा. अनिल भैय्या कॅबिनेट मंत्रीपद तुमची वाट पाहतेय असं स्पष्टपणे उद्धव ठाकरे यांनी अनिल राठोड यांना सांगितले.

ठाकरे यांच्या या विधानाने आणि आश्‍वासनाने नगरच्या शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला.

शिवसेनेच्या पहिल्या यादीत राठोड यांचे नाव आले नाही. मात्र, आज दुसर्‍याच दिवशी राठोड यांना मातोश्रीचे निमंत्रण आले आणि अनिल राठोड यांच्या हातात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत: पक्षाच्या उमेदवारीचा अधिकृतपणे एबी फॉर्म दिला.

हा फॉर्म देताना उद्धव ठाकरे यांनी राठोड यांच्या संभाव्य मंत्रीपदाबाबत सुतोवाच करतानाच नगर जिल्ह्याला राठोड यांच्या रुपाने कॅबिनेट मंत्रीपद देणार असल्याचे स्पष्ट केले.

अनिल राठोड यांचे पक्षसंघटनेतील योगदान सर्वश्रूत आहे. २५ वर्षे आमदार म्हणून काम करताना नगर जिल्ह्यातील साखर सम्राटांच्या विरोधात जिल्ह्यात शिवसेना वाढविण्याचे काम राठोड यांनी केले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post