बारामती कायमची बंद ठेवली तरी कुणाला काही फरक पडणार नाही : अंजली दमानिया


वेब टीम : पुणे
राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर पवार समर्थकांनी आज (बुधवार, 25 सप्टेंबर) ‘बारामती बंद’ची हाक दिली आहे.

ईडीच्या कारवाई विरोधात बारामती शहरातील बाजारपेठा, दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

यावरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. बारामती बंद करणं हास्यास्पद असल्याचं दमानिया यांनी म्हटलं आहे.

शरद पवारांच्या समर्थकांनी बारामती बंदचं आवाहन केलं आहे. हे हास्यास्पद आहे.

चोरी तो चोरी उपरसे सिना जोरी असं सांगत बारामती कायमची बंद ठेवा, कोणाला फरक पडतोय? मात्र त्यामुळे तुम्ही बारामतीपुरते मर्यादित आहेत हे सिद्ध होतं अशा शब्दात दमानिया यांनी ट्विटरवरून टीवटीव करत राष्ट्रवादीवर टीका केली आहे.

दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या निमित्ताने ही बैठक होणार आहे.

 जयंत पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार आहेत. अजित पवारही बैठकीला हजर असण्याची शक्यता आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांना डेंग्यूची लागण झाल्यामुळे सक्तीची विश्रांती सांगितली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post