शास्त्रज्ञ करताहेत डेंग्यूरोधक डासांची पैदास


वेब टीम : वॉशिंग्टन
चालूवर्षी फिलिपीन्स, व्हिएतनाम, मलेशिया, म्यानमार व कंबोडिया या नैऋत्य आशियाई देशांमध्ये डेंग्यूमुळे भयावह स्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी वाढते तापमान व बचावाचे अपुरे पर्याय कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

दुसरीकडे शास्त्रज्ञांचा एक चमूने डासांमुळे फैलावणाऱ्या डेंग्यूचा मुकाबला करण्यासाठी डेंग्यूरोधक डासांची पैदास करण्यासंबंधी संशोधन करत आहेत. यामुळे या आजाराशी दोन हात केले जाऊ शकतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

त्यासाठी नऊ देशांमध्ये चाचण्याही घेण्यात आल्या असून त्याचे चांगले परिणाम समोर आले आहेत. डेंग्यूचा फैलाव करणाऱ्या नर व मादी एडीज डासांना जंगलात सोडण्याआधी प्रतिरोधक बॅक्टेरिया वोल्बाचियाने संक्रमित केले जाते.

काही आठवड्यांतच डासांची पिल्ले वोल्बाचिया बॅक्टेरियासह जन्मास येतात. ते रोग प्रतिरोधकाच्या रुपात काम करतात. यामुळे फक्त डेंग्यूच नाही तर झाइका, चिकनगुनिया आणि पिवळा ताप यांसारख्या आजारांपासून बचाव केला जाऊ शकेल.

 उत्तर ऑस्ट्रेलियात त्याची पहिली चाचणी घेण्यात आली. व्हिएतनाममधील प्रकल्प समन्वयक गुएन बिन्ह गुयेन यांनी सांगितले की, वोल्बाचिया बॅक्टेरिया संक्रमित डास सोडल्यानंतर डेंग्यूचे प्रमाण घटल्याचे दिसून आले.

गुएन यांच्या चमूने व्हिएतनाममधील डेंग्यूग्रस्त जिल्ह्यांमध्ये वोल्बाचिया संक्रमित डास सोडले. तिथे डेंग्यूचे प्रमाण ८६ टक्क्यांनी घटले. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, नैऋत्य आशियात यंदा डेंग्यूचे सुमारे ६.७० लाख रुग्ण आढळून आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post