नगर-दौंड रस्त्यावरील भीषण अपघातात 4 तरुण जागीच ठार


वेब टीम : अहमदनगर
नगर- दौंड रस्त्यावरील बाबुर्डी बेंद परिसरात असणार्‍या महादेव वस्तीजवळ मालट्रक व कारच्या भीषण अपघातात चौघे जागीच ठार झाले. त्यातील तिघेजण भिंगारचे असल्याने भिंगारवर शोककळा पसरली आहे. ही घटना गुरूवारी (दि.26) पहाटे 2 च्या सुमारास घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, गुरूवारी पहाटे 2 च्या सुमारास श्रीगोंद्याहुन नगरकडे येणार्‍या कार (क्र. एम एच 04 बी वाय 4857) ने ट्रक (क्र. एम पी 09 एम एच 8378) ला जोराची धडक दिली. ही धडक एवढी जोराची होती की कारमध्ये बसलेले चौघे जण जागीच ठार झाले.

मृतांमध्ये जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे यांचा चुलत भाचा तर महेश झोडगे यांचा सख्खा भाचा अनिकेत मच्छिंद्र भुजबळ (वय 20, रा. एम. ई. कॉलनी, वडारवाडी, भिंगार), आसिफ याकुब पठाण (वय 21, रा. नागरदेवळे), गोपीनाथ गंगाराम कुर्‍हाडे (वय 27, रा. वडारवाडी, भिंगार), शुभम विलास खेडकर (वय 21, रा. वाळकी) यांचा समावेश आहे.

या घटनेची माहिती कळताच जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्यासह सरपंच दीपक साळवे, शरद चोभे, मिनीनाथ चोभे, राघु चोभे, गणेश भोसले यांच्यासह अनेक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. भिंगार व परिसरातील तिघांचा मयतांमध्ये समावेश असल्याने आज भिंगार परिसरावर शोककळा पसरली.

याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी सीआरपीसी 174 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक जारवाल हे करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post