एटीएम कार्ड चोरून लाखोंची फसवणुक


वेब टीम : अहमदनगर
पैसे काढण्यास मदत करण्याच्या बहाण्याने कार्डची अदलाबदल करून अनोळखी इसमाने लाखोंची फसवणुक केल्याचा प्रकार सुपा येथे 25 ऑगस्ट रोजी घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, संतोष रामा शिंदे (वय 38, मुळ रा. हंगा, ता. पारनेर, सध्या रा. शासकीय निवासस्थान, कोर्टगल्ली शेजारी, नगर) हे सुपा येथील एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता पैसे काढण्यास त्यांना अडचण आल्याने त्यांनी जवळ उभ्या असलेल्या इसमाची मदत घेतली.

 त्या इसमाने शिंदे यास एटीएमद्वारे 20 हजार रूपये काढुन दिले. मात्र एटीएम कार्ड देताना कार्डची अदलाबदल केली. त्यानंतर त्या इसमाने त्यांच्या खात्यातुन 1 लाख 82 हजार 600 रूपये परस्पर काढुन घेऊन त्यांची फसवणुक केली.

याप्रकरणी संतोष शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुपा पोलिसांनी भादंविक 420 प्रमाणे फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस हवालदार अकोलकर हे करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post