आयुषमानला वाढदिवशी मिळाली खास भेट


वेब टीम : मुंबई
अभिनेता आयुषमान खुराना त्याचा 35वा वाढदिवस साजरा करतोय. त्याच्या वाढदिवशीच एक गुड न्यूज समोर आली आहे. नुकताच आयुषमानचा ड्रीम गर्ल चित्रपट प्रदर्शित झाला.

ड्रीम गर्ल प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी आयुषमानचा सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. वाढदिवशी आयुषमानला मिळालेली ही भेटच ठरली आहे.

चित्रपटाने पहिल्याच दिवशी 10.5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या वर्षातील मिड-रेंज चित्रपटांमध्ये विकी कौशलच्या उरीने 8.20 कोटींची ओपनिंग केली होती.

कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन यांच्या मलुका छुप्पीफला 8 कोटींची ओपनिंग मिळाली होती.

तर नितेश तिवारी दिग्दर्शित छिछोरेने पहिल्या दिवशी 7.32 कोटींची कमाई केली. आयुषमानच्या ड्रीम गर्लने हे रेकॉर्ड तोडले आहेत.

या चित्रपटाने आयुषमानच्या बधाई हो (7.35 कोटी) आर्टिकल 15 (5.2 कोटी), अंधाधुन (2.70 कोटी), शुभ मंगल सावधान (2.71 कोटी) या चित्रपटांनाही मागे टाकलं आहे.

आयुषमानला मबधाई होफ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post