मोदी आता सर्वात मोठे नेते : संजय राऊत


वेब टीम : मुंबई
नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. एकेकाळी बाळासाहेब ठाकरे सर्वात मोठे नेते होते.

त्यांच्या नावाचा फायदा भाजपाला झाला. बाळासाहेबांच्या नावावर भाजपा महाराष्ट्रात वाढली.

आज बाळासाहेब ठाकरे हयात नाही. आता मोदी सर्वात मोठे नेते आहे.

जर डोनाल्ड ट्रम्प यांना मोदींचा आधार घ्यावा लागतो तर भारतातही आधार घ्यायला हवा असं विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे.

एका हिंदी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत राऊत बोलत होते. युतीसंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले, जागावाटप सोप्पं नसतं. यात मोठा भाऊ-छोटा भाऊ विषय नाही.

लोकसभेत युती झाली तेव्हा अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांनी 50-50 फॉर्म्युला निश्चित केला होता. मात्र निकालानंतर भाजपाला इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळालं त्यामुळे शिवसेना सध्या निर्णायक परिस्थितीत आहे.

महाराष्ट्रात मतांचे विभाजन होऊ नये ही दोन्ही पक्षांची गरज असल्याचे राऊत यांनी सांगीतले.

यावरून असे दिसते की शिवसेनेला भाजपचा छोटा भाऊ होण्यात पक्षप्रमुखाकडून विशेष अडचण नाही शिवाय युतीशिवाय शिवसेना सत्तेत टिकू शकणार नाही याची जाणिवदेखील शिवसेनेला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post