बीडमध्ये यंदाच्या हंगामातील सर्वांत जास्त पर्जन्यवृष्टीवेब टीम : बीड
बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने चांगली हजेरी लावली.बीड जिल्ह्यासाठी या हंगामातील हा सर्वात मोठा पाऊस ठरला.

बीडमध्ये सोमवारी संध्याकाळी अचानक पावसाला सुरूवात झाली. पावसाचा जोर जास्त असल्याने काही तासांतच शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यासह बऱ्याच नागरी वसाहतींमध्ये पाणी साचले होते.

पावसाने सुरूवातीपासूनच मराठवाड्याकडे पाठ फिरवली आहे.काही भागात जूनमध्ये चांगली हजेरी लावल्यानंतर पाऊस गायब झाला होता. त्यानंतर म्हणावा तसा पाऊस मराठवाड्यात झाला नाही.

परतीच्या पावसाने मराठवाड्यात पाऊल ठेवले आहे.परभणी, हिंगोलसह बीड जिल्ह्यात सोमवारी परतीचा दमदार पाऊस झाला.

शहरातील बऱ्याच नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरले होते. बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातही पाणी शिरल्याने पोलिसांची तारांबळ उडाली.

पोलीस ठाण्यात तीन फुटांपर्यंत पाणी तुंबले होते. संपूर्ण पावसाळ्यात पहिल्यांदाच बिंदूसरा नदी वाहती झाली.

नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाल्याने शहरातील दगडी पूलापर्यंत पाणी आले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post