बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध महिला ठार


वेब टीम : अहमदनगर
पारनेर तालुक्यातील वडनेर बुद्रुक येथे शनिवारी (दि.31) पहाटे प्रात:विधीसाठी शेजारील डाळींबाच्या बागेत गेलेल्या राधाबाई कारभारी वाजे (वय 70) यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.

राधाबाई वाजे या पहाटे घरामागील डाळिंबाच्या बागेत प्रात:विधीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी बिबट्याने त्यांच्यावर झडप घालून दूर ओढत नेले. बिबट्याच्या हल्ल्यात त्यांचे शीर आणि एक पाय शरीरापासून वेगळा झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस व वनविभागाचे आधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यादरम्यान, ग्रामस्थांनीही मोठी गर्दी केली होती.

वडनेर, वाजेवाडी शिरापूर परीसरात गेल्या दोन तीन महिन्यांपासून बिबट्याचा वावर होता. अनेक जनावरांना या बिबट्याने लक्ष्य केले होते. आता एका महिलेचाच बळी गेल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे.

घटनास्थळी पारनेरचे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार, तहसीलदार प्रवीण चव्हाणके, निलेश लंके, वन परिमंडळ अधिकारी एस. एस.साळवे, यु.पी. खराडे, वनअधिकारी रंगनाथ वाघमारे यांनी भेट देवून पाहणी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post