शिवसेनेसोबत युती करण्यास 'या' भाजप आमदाराने केला विरोध


वेब टीम : मुंबई
विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे प्रयत्न वरिष्ठ पातळीवर सुरू असतानाच शिवसेनेबरोबर युती करणार नाही, अशी भूमिका भाजपच्या आमदाराने घेतली आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री आणि इतर वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन त्याबाबत भूमिका मांडणार असल्याचे या आमदाराने म्हटले आहे.

मीरा भाईंदर महानगरपालिकेत शिवसेनेने स्थायी समिती सभागृह व महापौर दालनाची तोडफोड केली.

तोडफोड केल्यामुळे आमदार नरेंद्र मेहता यांनी शिवसेनेबरोबर युती करणार नाही असे सांगितले आहे.

शिवसेना निवडून येते ती फक्त भाजप व मोदींमुळे निवडून येते. आज जी घटना घडली आहे ती अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.

महिला महापौर यांच्या केबिनमध्ये जाऊन शिवीगाळी केली व कार्यालयाची तोडफोड केली आहे. मारामारी करणे, आई बहिणीवर शिवीगाळी करणे अत्यंत निंदनीय आहे.

तेही महिला महापौर यांच्या केबिनमध्ये जाऊन तोडफोड करून शिवीगाळ करणे म्हणजे अत्यंत शरमेची गोष्ट आहे. शिवसेनेने तोडफोड करून जनतेच्या पैशाचे नुकसान केले आहे.

यासाठी जनतेचे पैसे वापरले आहेत ते काही तुमच्या घरचे नाहीत हे त्यांना भरावे लागतील. त्यांना याचे उत्तर येणार्‍या महासभेत दिले जाईल.

नागरिकही त्यांना उत्तर देतील. एकीकडे महिलेच्या सन्मानाची गोष्ट करतात आणि दुसरीकडे महिलांचा अपमान करतात.

आमदार प्रताप सरनाईक व त्यांच्या नगरसेवकांनी सभागृहात येऊन माफी मागितली नाही तर त्यांच्याबरोबर युती करणार नाही असे आमदार मेहता यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post