--> राजकारण : पती राष्ट्रवादीत पत्नी भाजपमध्ये! | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

राजकारण : पती राष्ट्रवादीत पत्नी भाजपमध्ये!

वेब टीम : अहमदनगर जामखेड पंचायत समितीच्या विद्यमान उपसभापती राजश्रीताई सूर्यकांत मोरे यांचे पती व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुर्यकांत (नान...


वेब टीम : अहमदनगर
जामखेड पंचायत समितीच्या विद्यमान उपसभापती राजश्रीताई सूर्यकांत मोरे यांचे पती व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुर्यकांत (नाना) मोरे यांनी नुकतेच पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या विरोधात बंड पुकारून भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. तसेच ते येत्या २३ तारखेला कर्जत येथे राष्ट्रवादी चे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत.

सुर्यकांत मोरे यांच्या पत्नी राजश्री मोरे जामखेड पंचायत समितीच्या उपसभापती आहेत. मोरे यांनी भाजपा सोडली पण पत्नी भाजपमध्येच राहिल, कार्यकाळ पूर्ण करेल असेही मोरे यांनी सांगितले. त्यामुळे पती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर पत्नी भाजपमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

भाजपा चे जिल्हा उपाध्यक्ष सुर्यकांत मोरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी सरपंच दादासाहेब वारे, संतोष कात्रजकर, देवदैठणचे सरपंच अनिल भोरे, शरद मोरे, शांतीलाल खैरे, नानासाहेब भोरे, अशोक ढमढेरे प्रसन्न कात्रजकर, दिलीप कवादे, सचिन खैरे, विजय धुमाळ, माजी सरपंच शांतीलाल खैरे, माजी सरपंच नानासाहेब भोरे, याांच्या सह अनेक ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढे बोलताना मोरे म्हणाले की अडचणीच्या काळात पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना मी खुप मदत केली. पण ज्यावेळी राम शिंदे मंत्री झाले त्यावेळी त्यांच्या डोक्यात मंत्री पदाची हवा शिरली व ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांना विसरले. मंत्र्याची कामे पीए करतात अन पीएच कोट्यावधी रुपयांचे मालक झाले आहेत.

निष्ठावान कार्यकर्ते घोंगड्या उचलण्याचेच काम करत आहेत. पीए विरोधात पालकमंत्री प्रा. राम शिंदे हे कसलीही तक्रार ऐकून घेत नाहीत. तीसरी नापास आसलेल्या पी ए कडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती आली कोठून असा सवाल मोरे यांनी उपस्थित केला.

कार्यकर्त्यांचा वापर फक्त निवडणुकी पुरता होतो. व पुन्हा सर्व कारभार पी ए च्या हातात दिला जातो. भाजप मधिल नेते हे मंत्र्यांच्या दबावापोटी आहेत. आज ना उद्या आपलं काहीतरी होईल ही भावना त्यांच्या मनाशी आहे. मात्र पक्षात कोणाचाच फायदा होत नाही.

कर्जत जामखेड मतदारसंघात सध्या रोहित पवार करत असलेल्या सामाजिक कामावर मी प्रभावीत झालो आहे. त्यांच्या कामाची पद्धत, मनमिळावू स्वभाव व सर्व सामान्य लोकांमध्ये मिळुन मिसळुन काम करण्याची पध्दतीने त्यांच्या कडे अनेक तरुण अकर्षीत होत आहेत.

त्यामुळे मी देखील दि २३ रोजी कर्जत येथील राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यक्रमात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व अभिनेते खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहे अशी माहिती सुर्यकांत मोरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4282,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1026,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2656,Politics,2717,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: राजकारण : पती राष्ट्रवादीत पत्नी भाजपमध्ये!
राजकारण : पती राष्ट्रवादीत पत्नी भाजपमध्ये!
https://1.bp.blogspot.com/-1nU5g7tNJsc/XYZRee8k_8I/AAAAAAAADbA/IRCCXtHC7IciJMjAIEztpC7nYCkxFoG6gCLcBGAsYHQ/s320/images%2B%25287%2529.jpeg
https://1.bp.blogspot.com/-1nU5g7tNJsc/XYZRee8k_8I/AAAAAAAADbA/IRCCXtHC7IciJMjAIEztpC7nYCkxFoG6gCLcBGAsYHQ/s72-c/images%2B%25287%2529.jpeg
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2019/09/Bjp-ncp.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2019/09/Bjp-ncp.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content