नगरमध्ये इमारत कोसळली; अग्निशामक दलाच्या प्रयत्नाने आजीबाई बचावल्या


वेब टीम : अहमदनगर
टांगेगल्ली येथील पावसामुळे जुना वाडा चा काही भाग कोसळला व सदर वाड्यामध्ये राहणाऱ्या वृद्ध महिलेला आत मध्येच अडकून राहावे लागले. परिसरातील नागरिकांनी सदर घटना पाहता अग्निशामक दलाच्या पथकाकडे संपर्क साधला असता अग्निशामक दल हजर झाले व सदर वृद्ध महिलेस दोन तासाच्या परिश्रमानंतर सुखरूप बाहेर काढून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात येथे हलवण्यात आले.

दरम्यान महापालिका प्रशासनाने धोकादायक इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत. पावसाळ्यात धोकादायक इमारती पडू लागल्याने इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

यावेळी अशी माहिती समजते की सदर वाडा हा जुन्या बनावटीचा होता व त्यामुळे काही भाग पडका झाला होता .

डांगे गल्ली मध्ये ठाणेकर नावाचा हा वाडा होता या वाड्यामध्ये उषा त्रंबकेश्वर कावस्कर, वय 70 या वृद्ध आजी राहात होत्या. परंतु आता अग्निशामक दलाने वृद्ध महिलेचा सुखरूप बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले.


धोकादायक इमारती बाबत महापालिका प्रशासन कोणती भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post