वेब टीम : दिल्ली चांद्रयान २ मोहिमेचा आजचा महत्त्वाचा दिवस आहे. मुख्य यानातून लँडर विक्रम आज दुपारी १ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास यशस्...
वेब टीम : दिल्ली
चांद्रयान २ मोहिमेचा आजचा महत्त्वाचा दिवस आहे. मुख्य यानातून लँडर विक्रम आज दुपारी १ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास यशस्वीपणे वेगळे झाले.
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) ट्विटरवरून ही माहिती दिली.
आता खऱ्या अर्थाने चांद्रयानमधून वेगळ्या झालेल्या लँडरमधून रोव्हर विक्रम येत्या ७ सप्टेंबर रोजी चंद्रावर उतरणार आहे.
चांद्रयान – २ ने यापूर्वीच चंद्राच्या पाचव्या कक्षेत प्रवेश केला.चांद्रयान २ मधून आज लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान वेगळे झाले.चांद्रयान – २ ७ सप्टेंबरला चंद्रावर उतरणार आहे.
वैज्ञानिकांची शनिवारी उच्चस्तरीय बैठक झाली.चांद्रयानाने चंद्राच्या पाचव्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर लँडर आणि रोव्हरला वेगळं करण्याचा निर्णय घेतला गेला. या कक्षेपासून चंद्राचे अंतर अवघे १०९ किलोमीटर आहे.
COMMENTS