ईडीच्या कारवाईत राजकारणाचा संबंध नाही : मुख्यमंत्री फडणवीस


वेब टीम : मुंबई
शिखर बँक गैरव्यवहार प्रकरणात होत असलेल्या कारवाईशी राज्यसरकारचा काहीही संबंध नाही. सरकार कोणावरही सूडबुद्धीने कारवाई करत नाही.

ईडीच्या कारवाईत कोणतंही राजकारण झालेलं नाही, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक बड्या नेत्यांवर ईडीने शिखर बँक गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.

‘मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात कुणाची काय भूमिका आहे याची चौकशी सुरू आहे.

१०० कोटींपेक्षा जास्त रकमेचा घोटाळा असेल तर ईडी त्याचा तपास करतो. त्यात राज्यसरकारचा काहीही हस्तक्षेप नसतो. न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई सुरु असते.’ असं फडणवीस म्हणाले.

जिंकणारा पक्ष असलं राजकारण करत नाही : फडणवीस
जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, जे दोषी नसतील त्यांच्यावर कारवाई होणार नाही.

राज्यात पुन्हा युतीचंच सरकार येणार आहे. त्यामुळे जिंकणारा पक्ष कधीही असलं राजकारण करत नाही, ज्यांना राजकारण कळतं त्यांना हे माहीत आहे.

आम्हाला असे हातखंडे वापरण्याची गरज नाही. जे काही होईल ते नियमानेच होईल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post