दुःखद : तेलगू कॉमेडियन वेणू माधव कालवश


वेब टीम : सिकंदराबाद
प्रसिद्ध तेलुगू अभिनेते व कॉमेडियन वेणू माधव यांचे वयाच्या ३९व्या वर्षी निधन झाले. सिकंदराबादमधील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मूत्रपिंडाशी संबंधित आजाराने ते त्रस्त होते. प्रकृती अधिकच बिघडल्याने २४ सप्टेंबर रोजी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र २४ तासांच्या आतच त्यांची प्राणज्योत मालवली.

रुग्णालयातून त्यांना गेल्या आठवड्यात सोडले होते.लवकरात लवकर किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.

पण डिस्चार्ज मिळाल्यानंतर दोन दिवसांतच त्यांची तब्येत पुन्हा बिघडली. वेणू माधव यांच्या अकस्मात निधनाने टॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

गेल्या दोन वर्षांत त्यांनी राजकारणातही सहभाग घेतला. ‘तेलुगू देसम पार्टी’साठी त्यांनी प्रचार केला होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post