काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा राजीनामा; शिवसेनेत करणार प्रवेश


वेब टीम : अहमदनगर
काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना मोठा धक्का बसला आहे.

गुरुवारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर तत्कालीन विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ सुजय विखे पाटील हे भाजपात गेले. व खासदार झाले.

त्यांनतर ना. विखे पाटील यांनीही काँग्रेस ला रामराम करत भाजपाचा रस्ता धरला. तेव्हापासून काँग्रेस ला अहमदनगर जिल्ह्यात गळती लागली आहे. दरम्यान काँगेस ने विखेंचे विरोधक बाळासाहेब थोरात यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. पक्षाला लागलेली गळती रोखण्याचे आव्हान प्रदेशाध्यक्ष थोरात यांच्या समोर आहे.आमदार कांबळे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी राजीनामा दिला. सेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली. बैठकीनंतर त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.

कांबळे यांनी काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. कांबळे हे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांचे कट्टर समर्थक होते. पण त्यांनी थोरात यांची साथ धरली होती. आज त्यांनी थोरात यांची साथ सोडली.

आमदार कांबळे यांची काल सेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याबरोबर बैठक झाली. यावेळी सेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे, खासदार प्रताप जाधव, उद्योगमंत्री सुभाष देसाई हे उपस्थित होते. कांबळे यांना सेनेने विधानसभेची उमेदवारी देण्याचे कबूल केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post