वेब टीम : अहमदनगर
मोबाईलमध्ये काढलेले फोटो चेक करायचे आहे, असे सांगुन दोन अनोळखी इसमांनी 15 हजार रूपये किंमतीचा विवो कंपनीचा मोबाईल फसवुन चोरून नेला.
ही घटना नगर-पुणे रोडवर कायनेटिक चौकाजवळील इलाक्षी शोरूममसमोर सोमवारी (दि.16) सकाळी 11 च्या दरम्यान घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, गोरख दत्तात्रय चव्हाण (वय 20, रा. राणी लक्ष्मीबाई चौक, केडगाव) हा त्याच्या कामावरून घरी जात असताना अॅक्टीव्हा गाडीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यास थांबवुन तु तुझ्या मोबाईलमध्ये मुलींचे फोटो का काढले आहे? ते राजुभाऊंनी पाहिले आहे. तु तुझा मोबाईल आम्हाला दे, तो आम्हाला चेक करायचा आहे, असे सांगुन मोबाईल घेतला.
मोबाईल घेऊन त्याला यश पॅलेस जवळील चौकात नेले व तेथुन ते पसार झाले. याप्रकरणी गोरख चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी भादंविक 420, 379, 34 प्रमाणे फसवणुक व चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस हवालदार ढगे हे करीत आहेत.
Post a Comment