नागवडे यांच्या मुलासह दोघांना बेदम मारहाण


वेब टीम : अहमदनगर
श्रीगोंद्यातील शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांचा मुलगा पृथ्वीराज व त्यांच्या दोन सहकार्‍यांना पुणे-सोलापुर महामार्गावर कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील नाक्यावर दहा ते पंधऱा जणांच्या जमावाने जबर मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली आहे.

याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून रस्त्यावर साईड देण्याच्या किरकोळ करणातून ही मारहाण करण्यात आली आहे.

या प्रकरणी पृथ्वीराज राजेंद्र नागवडे यांनी दिलेल्या फिर्यादी लोणी काळभोर पोलिसांनी मांजरी फार्म परीसरातील निलेश दिवेकर, सागर मुळे, विनोद ढोरे, शुभम हरपळे, महेश डोमाले, विराज हरपळे यांच्यासह दहा अनोळखी तरुणांच्या विरोधात जिवे मारण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post