गरज पडल्यास सीमेपार जात कारवाई करू : सेनाप्रमुखांचा इशारा


वेब टीम : दिल्ली
पाकिस्तानमधील बालाकोट येथे दहशतवादी तळ पुन्हा एकदा सक्रिय झाल्याची माहिती समोर येत असून या दरम्यान लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी सीमारेषेवर लपाछपीचा खेळ जास्त वेळ चालणार नाही असा इशारा दिला.

जम्मू काश्मीरमधील परिस्थितीचा फायदा पाकिस्तानला मिळवू देणार नाही अशी भारताची अगदी स्पष्ट भूमिका असून,गरज पडल्यास नियंत्रण रेषाही पार करु असे बिपीन रावत यांनी म्हटले.

एका खासगी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत स्पष्टपणे मांडत पाकिस्तानला सुनावले.

बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत.

मग आपल्या सर्जिकल स्ट्राइकचा काय फायदा झाला? या प्रश्नावर रावत म्हणाले की,“दोन्ही स्ट्राइकमध्ये एक महत्त्वाचा संदेश देण्यात आला होता तो म्हणजे, जोपर्यंत सीमेपार शांतता राहील आणि परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न होणार नाही तोपर्यंत सीमारेषा ओलांडली जाणार नाही.

पाकिस्तान दहशतवाद्यांना नियंत्रित करते,दहशतवादी त्यांचे प्रॉक्सी म्हणून काम करतात. पण यापुढे लपाछपीचा खेळ चालणार नाही.

जर आम्हाला सीमारेषा पार करावी लागली मग ती हवाई मार्गाने असो अथवा जमिनीवरुन, आम्ही ती करु”.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post