अर्थव्यवस्थेची स्थिती चिंताजनक : मनमोहन सिंह


वेब टीम : दिल्ली
माजी पंतप्रधान व अर्थतज्ञ मनमोहन सिंग यांनी रविवारी अर्थव्यवस्थेची स्थिती चिंताजनक असल्याचे सांगितले.

सरकारला ‘हाडवैराचे राजकारण’ बाजूला सारून अर्थव्यवस्थेला या मानवनिर्मित संकटातून बाहेर काढण्यासाठी विवेकी विचारसरणीकडे जाण्याचे आवाहनही त्यांनी केले. या मंदीला मोदी सरकारचे गैरव्यवस्थापन जबाबदार असल्याची टीकाही त्यांनी केली.

‘अर्थव्यवस्थेची स्थिती आज चिंताजनक आहे. गेल्या तिमाहीत जीडीपीच्या 5 टक्के वाढीचा दर आपण दीर्घकालीन मंदीच्या वाटेवर असल्याचे दर्शवतो.

भारताकडे वेगवान दराने वाढ होण्याची क्षमता आहे परंतु मोदी सरकारच्या गलथानपणामुळे वेग मंदावला आहे, असे त्यांनी एका निवेदनात म्हणले आहे.

सरकारवर निशाणा साधत सिंह म्हणाले की, देशातील तरुण, शेतकरी आणि शेतमजूर, उद्योजक आणि उपेक्षित वर्ग यांना अधिक सुविधा मिळणे गरजेचे आहे. हा मार्ग पुढे चालू ठेवणे भारताला परवडणारे नाही.’ असेही त्यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post