विधानसभा निवडणुका या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स म्हणजेच ईव्हीएमवरच


वेब टीम : मुंबई
कागदी मतपत्रिका आता इतिहासजमा झाल्या आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स म्हणजेच ईव्हीएमवरच घेण्यात येणार असल्याचा ठाम पुनरुच्चार केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी केला.

 उमेदवारी खर्चाच्या मर्यादेत वाढ करण्याचा सध्यातरी विचार नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सांगली, कोल्हापूरमधील पूरग्रस्तांच्या सुरू असलेल्या मदतकार्यात कोणतीच अडचण येणार नाही.

तसेच आचारसंहितेच्या काळातही जर आवश्यक असेल त्या मागणीचा आयोग निश्चितच सहानुभूतीपूर्वक विचार करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील निवडणुकांच्या तारखा दिल्लीतील पत्रकार परिषदेत घोषित होतील, असेही त्यांनी सांगितले.


महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्या अध्यक्षतेखालील पथक महाराष्ट्राच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले होते. त्यांच्यासोबत निवडणूक आयुक्त अशोक लवासा, सुशील चंद्रीदेखील होते. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक आढाव्याची माहिती दिली. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post