गणपती मिरवणूक मार्गावरील छते घेणार पोलिस ताब्‍यात


वेब टीम : अहमदनगर
नगर शहरात 12 सप्‍टेंबर 2019 रोजी श्री गणेश विजर्सन काढण्‍यात येणार आहे. या प्रसंगी शांततेचा कोणताही भंग न होऊ देण्‍यासाठी कोणतीही ईमारत किंवा जागा तात्‍पुरती बंद करता येईल किंवा आपल्‍या ताब्‍यात घेता येईल त्‍या अर्थी पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांना महाराष्‍ट्र पोलीस अधिनियमन 1951 चे कलम 39 अन्‍वये प्राप्‍त झालेल्‍या अधिकाराचा वापर करुन दिनांक 12 सप्‍टेंबर 2019 रोजी श्री गणेश विसर्जन मिरवणुक मार्गावरील छत्‍ते (गच्‍ची) ताब्‍यात घेण्‍यात येणार आहेत.

अहमदनगर शहरातील श्री गणेश विसर्जन मार्गावरील - कापड बाजार बाबुशेठ बोरा, शहाजी चौक, नितू ड्रेस, शंतीलाल चोपडा, कापड बाजार मोची गल्‍ली कार्नर श्री शाम देडगावकर, साफल्‍य इमारत पाटेगल्‍ली कार्नर, डॉ.कुलकर्णी यांची इमारत, नवीपेठ मनपा दवाखाना श्री कन्‍हैय्यालाल चंगेडिया, नवीपेठ इचरजबाई फिरोदिया शाळेची इमारत, खामकर चौक लोढा हाईटस, खामकर चौक राम मंदिर, छाया टॉकिज बडवे हॉस्‍पीटल, डी चंद्रकात टेलर्स, संतोष गुगळे याची इमारत रंगारगल्‍लीकडे जाणारे रोडवर, डॉ. सुंदर गोरे हॉस्‍पीटल, चौपाटी कारंजा, दिपाली एक्‍झीबीटर बिर्ल्‍डींग , बेलदार गल्‍ली कॉर्नर, सुरतवाला बिर्ल्‍डींग तेलीखुंट, श्री संतोष गुगळे यांची इमारत खामकर चौक, सुनहरी मस्जिद अल्‍पना बेकरीचे वर चितळे रेाड, उल्‍हास टेलर्स राजू ढोरे यांची इमारत नेता सुभाष चौक, देशबंद हॉटेल्‍स श्रीमती गोंगे यांची इमारत चितळे रोड, दिपक आईल डेपो श्री दिपक परदेशी, श्री गणेश अष्‍टेकर ,कागद कुट्टा मस्जिद ट्रस्‍टी शेख चॉंद भाई, पटेल मेडिकल श्री पटेल, तांबे मेडिकल श्री सुभाष पाठक, दत्‍त मदिर ट्रस्‍ट श्री कोपरगावकर यांची इमारत चौपाटी कारजा, दिल्‍लीगेट वेस, या इमारतीचे छते (गच्‍ची) दिनांक 12 सप्‍टेंबर 2019 रोजी सकाळी 8 वाजेपासून दिनांक 13 सप्‍टेबर 2019 रोजी सकाळी 8 वाजेपर्यत तात्‍पुरत्‍या स्‍वरुपात ताब्‍यात घेण्‍यात येणार आहेत असे पो‍लीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी एका प्रसिध्‍दी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post