मूलभूत गरजांसाठी हाफीजला पैसे काढूद्या; पाकची विनंती


वेब टीम : इस्लामाबाद
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला स्वतःच्या व कुटुंबियांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी पैसे काढण्याची परवानगी द्या, अशी विनंती पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा मंडळाकडे केली आहे.

पाकिस्तान सरकारनेच संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा मंडळाच्या ठरावानुसार हाफीजची बँक खाती गोठवली होती.

संयुक्त राष्ट्र संघाने जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख असणाऱ्या हाफीज सईदला खास नामांकीत जागतिक दहशतवादी घोषित केले आहे.

अमेरिकेच्या कोषागार विभागानेही २०१२ पासून 26/11च्या मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असणाऱ्या हाफीजला न्यायालयात हजर करण्यास पुरेशी माहिती देणाऱ्याला 10 मिलियन डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे.

आता सुरक्षा मंडळाने हाफीजला १,५०,००० पाकिस्तानी रुपये काढण्याची परवानगी दिली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post