'असे' केल्यास तुम्हाला कुणीही करू शकणार नाही संमोहित...


वेब टीम : पुणे
शाळेमध्ये कोणीतरी तुमच्यासमोर संमोहनाचा प्रयोग करून दाखवला असेल. चार-पाच मुलांना बोलावून त्यांना संमोहित केले असेल. संमोहित केल्यानंतर त्यांना गाणी म्हणायला व नाचायला लावले असेल. एवढेच काय, उकडत असताना ‘‘काय थंडी आहे बुवा’’ असे म्हणायला लावून त्यांना कुडकुडायलाही लावले असेल.

तुमची अगदी हसता हसता पुरेवाट झाली असेल. गंमतीचा कळस म्हणजे प्रयोग करणारा संमोहित माणसाला सांगतो की, ‘‘तुझ्यासमोर अमिताभ बच्चन बसलेला आहे (प्रत्यक्षात तेथे एखादा टेबल असतो!) तेव्हा त्याची मुलाखत घे;’’ आणि ती व्यक्ती खोट्या अमिताभची मुलाखतही घेते.

वरील उदाहरणांमुळे तुम्हाला अशी भीती वाटणे रास्त आहे की, तुम्हाला कोणी संमोहित केले तर ती व्यक्ती सांगेल ते तुम्ही कराल. चोरी कर म्हटले की चोरी करावी लागेल वगैरे.

 यात वर्तमानपत्रात येणार्‍या बातम्या, ज्यात एक बाई साधुच्या मागे निघून गेली, अशाप्रकारेच काही लिहिलेले असते, त्यांचाही हातभार लागतो; पण हे खरे असते काय? संमोहनाचा महत्त्वाचा भाग म्हणजे तुमची इच्छा नसल्यास कोणीही तुम्हाला संमोहित करू शकत नाही.

कारण तुम्ही संमोहन करणारा काय म्हणतोय, काय करतोय यावर लक्ष केंद्रितच केले नाही तर तुम्ही संमोहित होणार नाही.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे संमोहनावस्थेतदेखील माणूस त्याच्या सद्सद्विवेक बुद्धीला पटणार नाहीत, अशा गोष्टी कधीही करणार नाही.

सुशील अशा सज्जन स्त्रीला अंगावरचे कपडे उतरवायला कोणी भाग पाडू शकणार नाही व सज्जन मुलाला कोणी चोरी करायला लावू शकणार नाही.

 त्यामुळे संमोहन करणार्‍याला घाबरण्याचे कारण नाही. मजा म्हणून त्याचा आनंद घ्यायला काहीच हरकत नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post