वेब टीम : मुंबई भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी पात्र उमेदवारांना एसएसबी प्रशिक्षण वर्ग छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र,...
वेब टीम : मुंबई
भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी पात्र उमेदवारांना एसएसबी प्रशिक्षण वर्ग छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
या प्रशिक्षण वर्गासाठी सैन्य दलातील तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षण मिळणार आहे. कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व स्पेशल एंट्रीव्दारे सैन्यदलात अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या तसेच ज्या महाराष्ट्राच्या नवयुवक, युवतींना सशस्त्र सैन्यदलाकडून एसएसबी परीक्षेची मुलाखत पत्रे मिळण्याची शाश्वती आहे.
अशा उमेदवारांना एसएसबी मुलाखतीच्या पूर्व तयारीसाठी महाराष्ट्र शासनामार्फत छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय महसूल आयुक्त कार्यालय परिसर, नाशिक येथे प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणाचा कालावधी दिनांक १९ सप्टेंबर २०१९ ते २७ सप्टेंबर २०१९ असा आहे. प्रशिक्षण कालावधीत निवासाची व प्रशिक्षणाची सोय विनामूल्य करण्यात आलेली असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेण्यासाठी दिनांक १६ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर येथे मुलाखतीस हजर रहावे, असे कळविण्यात आले आहे.
एस.एस.बी. प्रवेश वर्गासाठी खालीलप्रमाणे कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येताना सोबत आणणे आवश्यक आहे.
१) कंबाईन्ड डिफेन्स सर्विसेस एक्झामिनेशन (UPSC) अथवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी एक्झामिनेशन (UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्विसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे.
२) एनसीसी (सी) सर्टिफिकेट ए/बी ग्रेड मध्ये पास झालेले असावे व एनसीसी ग्रुप हेडक्वॉर्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी.
३) टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे.
४) युनिव्हर्सिटी एन्ट्री स्किमसाठी एसएसबी कॉल लेटर आलेले असावे अथवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय आयुक्त कार्यालय परिसर, नाशिकरोड, नाशिक यांचा दूरध्वनी क्रं. ०२५३-२४५१०३१ व २४५१०३२ वर कार्यालयीन वेळेत (सकाळी १०.०० ते सायं. ५.३०) संपर्क साधावा.
COMMENTS