आज राष्ट्रवादी, उद्या शिवसेनेवरही अशीच वेळ येणार : जयंत पाटील


वेब टीम : मुंबई
शिखर, राज्य सहकारी बँकेवरील घोटाळ्याप्रकरणी ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

हे सरकार विरोधकांना संपवण्यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर करत आहे. आजच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेस या कचाट्यात सापडली आहे. मात्र, उद्या शिवसेनेवरही हीच वेळ बेतू शकते, असा इशारा पाटील यांनी दिला.

त्यांनी शुक्रवारी ‘झी २४ तास’शी संवाद साधताना म्हटले की, भाजप विरोधकांना संपवण्यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे.

मात्र, यावेळी भाजपचा डाव उधळला गेला. परंतु आज राष्ट्रवादीवर आलेली वेळ उद्या शिवसेनेवरही येईल. आज आम्ही जात्यात आहोत, ते सुपात आहेत.

मात्र, भविष्यात शिवसेनेलाही अशा संकटांचा सामना करावा लागेल, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post